(दापोली)
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरसोली नं 1 या शाळेत विद्यार्थी सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत शस्त्र ओळख व प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस दापोली पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्री.मिलिंद चव्हाण, श्री.विकास पवार, श्री.धनाजी देवकुळे व वाहतूक नियंत्रक श्री.प्रवीण क्षीरसागर उपस्थित होते. श्री.विकास पवार यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना विद्यार्थी सुरक्षेविषयी माहिती सांगितली, त्याचबरोबर सामाजिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक नियमांची माहिती दिली. तसेच श्री.धनाजी देवकुळे साहेब यांनी विविध शस्त्रांची ओळख करुन दिली.श्री.प्रवीण क्षीरसागर साहेब यांनी वाहतूक नियमांची माहिती दिली.
या कार्यक्रमास शिरसोली, टांगर आणि मुगीज शाळेतील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ सुद्धा उपस्थित होते. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील या अधिकाऱ्यांचे शाळेतील विद्यार्थांना अतिशय उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल शिरसोली नं 1 शाळेच्या वतीने आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.