(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संदीप लक्ष्मण पवार यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सरपंच दिप्ती दिपक वीर व कळझोंडी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
संदीप पवार यांनी सामाजिक क्षेत्रात अतिशय उत्तम प्रकारे सेवा भावनेने काम केले आहे. गावात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ते कायम दक्ष असतात. गावात बिबट्याचा मुक्त संचार असून गावातील ब-याच शेतकरी बांधवांच्या पाळीव जनावरे या बिबट्यानी फस्त केली आहेत. अशा गोरगरीब शेतकऱ्यांना वन विभागाकडून भरीव स्वरुपात मदत मिळवून देण्यासाठी त्यांची सतत धडपड असते. विद्युत तारांच्या घर्षणामुळे वणवा गेला, विद्युत पोल पडला, रस्त्यावर पावसाळ्यात झाडे झुडुपे आडवी पडली तर ते तातडीने घटनास्थळी धाव घेत असतात. गावातील कामे, अडथळे दूर करण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक उपक्रमातही त्यांचा चांगला सहभाग असतो. गावात शांतता व सलोखा निर्माण करण्यात त्यांचा चांगला हातखंडा आहे. या सर्व बाबींचा विचार करून उपस्थित सर्वच बंधू भगिनींनी श्री.सदीप पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, त्यावेळी एकमुखी त्यांची बिनविरोध निवड केली.

