(राजापूर)
तालुक्यातील खडपेवाडी येथील हनुमान मंदिराच्या बाजूला गुजराळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून गोवा दारूसह एक युवक पकडला. मंगळवारी (दि. १३ ऑगस्ट) दुपारी १२.५५ वाजता ही कारवाई करण्यात आली.
राजापूर पोलिस ठाण्यातील पोलीस शिपाई महेश बाबासाहेब जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजप्रतीक प्रमोद पाटकर (वय ३०, रा. खडपेवाडी) हा आपल्या ताब्यातील सुझुकी अँक्सेस १२५ (क्र. MH-08-AU-7396) दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून तिच्या डिकीत गोवा बनावटीची दारू लपवून वाहतूक करताना आढळला.
पोलिसांनी तपासणी केली असता, त्याच्याकडून ‘हनी ब्लेंड प्युअर ब्रँडी’ कंपनीच्या १८० मिली मापाच्या प्लास्टिकच्या ३६ सीलबंद बाटल्या (किंमत १ हजार ऐंशी) तसेच मुद्देमालासाठी वापरलेली सिल्व्हर रंगाची सुझुकी ॲक्सेस दुचाकी (किंमत ५० हजार) असा एकूण ५१ हजार ऐंशी रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात गु.र.नं. १५०/२०२५ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)(ई) अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.

