( संगमेश्वर / मकरंद सुर्वे )
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे संगमेश्वर तालुका भाजप च्या वतीने हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . या रॅलीत संगमेश्वर तालुका भाजप चे पदाधिकारी, तसेच भाईशा घोसाळकर हायस्कुल व महाराष्ट्र उर्दू हायस्कुल कडवई चे विद्यार्थी तसेच भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
भारत सरकारच्या हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत सध्या देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कडवई मध्येही भारतीय जनतापार्टीच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कडवई ग्रामपंचायत कार्यालय ते कडवई बाजारपेठ अशी रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये भाईशा घोसाळकर ज्युनियर कॉलेज, महाराष्ट्र उर्दू हायस्कुल व काळसेकर कॉलेज चे विद्यार्थी, भाजपचे संगमेश्वर तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते .रॅलीमध्ये द्वानिक्षेपकावर देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. तसेच देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.
कडवई बाजारपेठ येथे दि इंग्लिश स्कुल कडवई चे प्राचार्य प्रांजल मोहिते यांनी संबोधित केले. यावेळी कडवई चे उपसरपंच दत्ताराम ओकटे, भाजप तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, चिटणीस अमित ताठरे, प्रसाद भिडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख अविनाश गुरव, कडवई पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सदानंद ब्रीद, भाईशा घोसाळकर हायस्कुल चे पर्यव्यक्षक संतोष साळुंखे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बोथरे आदी मान्यवर उपस्थित होते.

