(रत्नागिरी)
57 व्या आंतर महाविद्यालय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी २०२५- २६ या शैक्षणिक वर्षांमध्ये सहभाग घेतला. अनेक वर्ष यशस्वीतेची परंपरा राखत महाविद्यालय, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कामासाठी मुंबई विद्यापीठातर्फे गौरविण्यात आले.
भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या संघामध्ये लोककला सादरीकरणासाठी इटली येथे झालेल्या लोक महोत्सवामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयमधील प्रथम वर्ष बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ची विद्यार्थिनी मनस्वी जाधव हिला इटली येथे जाण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली उत्तम सादरीकरणासाठी तिला सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.
मुंबई विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कमिटी मध्ये आणि जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत असणारे डॉ. आनंद आंबेकर यांच्या सक्रिय आणि उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. गेली 18 वर्ष महाविद्यालयासाठी, रत्नागिरी जिल्हा आणि विद्यापीठ स्तरावर डॉ. आंबेकर कार्यरत आहे.
57 व्या युवा महोत्सवामध्ये जिल्हास्तरीय 17 महाविद्यालयांमधील युथ फेस्टिवल मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करून गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीने नाट्य,नृत्य,संगीत ,वाड :मय , हस्तकला मध्ये वर्चस्व मिळवून चॅम्पियनशिप करंडक प्राप्त केला.यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रा.वेदांग सौंदलगेकर उपस्थित होते.
सदर विद्यापीठातील तिहेरी सन्मानाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री.सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दूदगीकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ.कल्पना आठवले, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ.सीमा कदम विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच सर्व विभागाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.