(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा, सकाळी 8 वाजता पादुकांवर अभिषेक, दुपारी 12 वाजता पालखी प्रदक्षिणा, दुपारी 12.30 वाजता महाआरती आणि दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री. सहदेव पावसकर यांनी केले आहे.