(रत्नागिरी)
रत्नागिरी किनारपट्टीजवळील ऑफशोअर क्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर LED मासेमारीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने कडक कारवाई केली आहे. मासेमारी नौका IND MH-4-MM-601 (H. Simaak) ही मालक सुलताना अख्तर होडेकर यांच्या मालकीची नौका 21 डिसेंबर 2025 रोजी बेकायदेशीर LED दिव्यांच्या वापरातून मासेमारी करताना पकडण्यात आली.
ही कारवाई रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अंमलबजावणी पथकाने नियमित गस्तीदरम्यान केली. सदर नौका मत्स्य अंमलबजावणी अधिकारी श्री. चिन्मय संजय जोशी यांनी ताब्यात घेतली असून, या कारवाईसाठी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक श्री. तुषार करगुटकर, सागरी सुरक्षा रक्षक श्री. आकाश श्रीनाथ आणि श्री. मयूर कळंबटे यांनी सहकार्य केले.
ही संपूर्ण कारवाई सहाय्यक आयुक्त (मत्स्यव्यवसाय) रत्नागिरी श्री. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. बेकायदेशीर LED मासेमारीमुळे सागरी जैवविविधतेचे मोठे नुकसान होत असल्याने, अशा प्रकारच्या मासेमारीविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे.

