(रत्नागिरी)
कुणबी समाजातील विविध परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा “कुणबी विद्यार्थी गुणगौरव सोहळा” रत्नागिरी येथे माध्यमिक शिक्षक पतपेढी हॉल, साळवी स्टॉप येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात समाजातील विद्यार्थी, पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याचे आयोजन कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा रत्नागिरी, कुणबी कर्मचारी सेवा संघ रत्नागिरी, लोकनेते श्यामरावजी पेजे स्मृती ट्रस्ट आणि कुणबी समाज क्रांती संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकनेते शामरावजी पेजे स्मृती न्यास अध्यक्ष मा. श्री. सुजित झिमण यांनी भूषवले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री. अमर घाडगे शिक्षक केंद्र प्रमुख शिरगाव यांनी विद्यार्थ्याना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कुणबी समजोन्नती संघ ग्रामीण शाखा रत्नागिरी अध्यक्ष श्री. रामभाऊ गराटे,कुणबी कर्मचारी सेवा संघाचे अध्यक्ष संतोष रावणंग, कुणबी समाज क्रांती संस्था रत्नागिरी अध्यक्ष श्री सलील डाफळे,जितेंद्र राऊळ, संघांचे उपाध्यक्ष श्रीकांत मांडवकर,दत्ता खाडे, राजू रामगडे,सदाशिव पाचकूडे, खजिनदार गजानन धनावडे,राजीव दरडी,संदीप कुळये, संदीप मांडवकर यांची उपस्थिती लाभली.विशेष अतिथी कुणबी समजोन्नती संघ मुंबई रत्नागिरी शाखा अध्यक्ष सूर्यकांत गोताड, महिला अध्यक्ष सौ विनय गावडे, सौ साक्षी रावणंग, कुणबी युवा अध्यक्ष ऍड सागर कळंबटे, दत्ताराम नागले, अॅड. महेंद्र मांडवकर यांनी मार्गदर्शनपर भाषणात समाजातील विद्यार्थ्यांना नवीन दिशा देण्याचे कार्य केले.

या कार्यक्रमात इयत्ता १० वी, १२ वी, तसेच शिष्यवृत्ती, नवोदय, NMMS, CET, तसेच कला, क्रीडा, उद्योजकता क्षेत्रातील यशस्वी सव्वा तीनशे विद्यार्थ्यांचा सन्मान फोल्डर, प्रमाणपत्र, शाल, गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय बैकर, संतोष भुवड, श्री आरेकर, सुभाष पालये, अजय गावडे, जितेंद्र थराडे यांनी तर आभारप्रदर्शन श्री. दिगंबर घवाळी (सचिव कुणबी कर्मचारी सेवा संघ रत्नागिरी) केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व पदाधिकारी संतोष गोताड, हरिचंद्र गावडे,काशिनाथ घाणेकर, श्री मांजरेकर, लीलाधर कुड, किरण भुवड, सौ मंजिरी कळंबटे, सुभाष तांबे, सुहास बलेकर, पांडुरंग गावडे सदस्य, शिक्षकवर्ग व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचारांचे वाटप व अल्पोपहाराचे आयोजनही करण्यात आले होते.

