(देवरुख)
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेची सभा दिनांक १५ जून रोजी ज्येष्ठ नागरिक सभागृह, देवरुख येथे प्रादेशिक सचिव विजयराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
सभेची सुरुवात सचिव प्रकाश जाधव यांच्या मागील सभेच्या इतिवृत्त वाचनाने झाली, ज्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
यावेळी जून महिन्यात वाढदिवस असलेल्या २२ सभासदांचा गुलाब पुष्प देऊन विशेष सन्मान व अभिष्टचिंतन करण्यात आले.
राजाराम वनकर आणि मुकुंद मोहीरे या ज्येष्ठ सभासदांना संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. तसेच संघटनेचे सभासद श्री. विलास खर्डे यांचा मुलगा कुणाल खर्डे वकील झाल्याबद्दल अध्यक्ष विजयराव शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आला.
सभेदरम्यान अध्यक्ष विजयराव शिंदे यांनी सभासदांच्या शंकांचे निरसन करत केंद्रीय कार्यकारिणीच्या कार्याचे कौतुक केले. सदानंद विचारे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोफत एसटी पास योजना सुरू करण्यात आली याबद्दल अभिनंदनाचा ठरावही संमत करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रकाश जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.