(नाशिक / प्रतिनिधी)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या पावन उपस्थितीत बंगळुरू येथे रविवार दि. ३ ऑगस्ट रोजी सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक सेवेकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
सत्संग सोहळ्यानिमित्ताने माता सरस्वती पूजन सोहळा तसेच श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन आणि पादुका पूजनाचा दैवदुर्लभ सोहळाही गुरुपुत्र श्री. मोरे यांच्या सान्निध्यात संपन्न होणार आहे. सेवामार्गाच्या देश- विदेश अभियानातर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक बंगळुरू सेवाकेंद्राचे सेवेकरी परिश्रम घेत आहेत. यापूर्वीही गुरुपुत्र श्री मोरे यांनी बंगळुरू येथे अनेकदा दौरे करून घराघरात स्वामी कार्य पोहोचविण्यासाठी मार्गदर्शन केले होते. आता पुन्हा त्यांचा दौरा होत असल्यामुळे सेवेकरी आणि भाविकांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण झाला आहे.
सेवामार्गाचा बालसंस्कार, शिशु संस्कार,युवा प्रबोधन, गर्भसंस्कार, देश-विदेश अभियान आदी विभाग गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे कार्यरत आहेत. सेवामार्गाचे प्रमुख आणि कोट्यवधी सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आणि गुरुपुत्र श्री. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील वीस राज्ये आणि एकवीस देशांमध्ये दिंडोरी प्रणित सेवाकार्य यशस्वीपणे सुरू आहे.