(रत्नागिरी)
जिल्ह्यातील सेवा पुरवठादार व असुरक्षित गटांसाठी “सेक्स ट्रॅफिकिंग” या अत्यंत गंभीर सामाजिक विषयावर जनजागृती व क्षमतावर्धन कार्यक्रम जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने व एआरझेड संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील श्रीधर गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर, निवृत्त न्यायमूर्ती व माजी सदस्य सचिव, गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण व माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश गोवा श्रीमती सयोनारा टेलेस लाड, एआरझेड संस्थेचे संस्थापक व संचालक अरुण पांडे उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध सेवाप्रदाते व असुरक्षित गटांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सेक्स ट्रॅफिकिंगच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर उपाययोजना, मदत केंद्रांची भूमिका, मानसिक आरोग्य व पुनर्वसन याविषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले.