(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे सुपुत्र तथा रत्नागिरी शिवसेना शिंदे गटाचे तरुण तडफदार निष्ठावंत शिवसैनिक अभिषेक उर्फ भैय्या उदय साळवी यांची रत्नागिरी शिंदे गट शिवसेनेच्या उपतालुका संघटकपदी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री आणि पालकमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांच्या आदेशानुसार तसेच रत्नागिरी तालुक्याचे शिंदे गट शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी आणि उपतालकाप्रमुख राजू साळवी यांच्या विशेष शिफारसीनुसार रत्नागिरी शिंदे गट शिवसेनेच्या उपतालुका संघटकपदी नव्याने नियुक्ती झाली आहे.
अभिषेक उर्फ भैय्या साळवी हे मालगुंड मधील एक नामांकित तरुण उद्योजक असून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये गावातील तरुणांना एकत्रित करून सामाजिक आणि लोकोपयोगी सेवेचे काम करण्यात विशेष पुढाकार घेतला आहे. तसेच तरुण पिढीला अधिक विकसित करण्यासाठी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात तरुण तरुणींना नवीन व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर आपल्या पक्षाचे संघटनात्मक काम मजबूत करण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यावर भर दिला आहे. या विशेष बाबींची दखल घेऊन त्यांची रत्नागिरी शिंदे गट शिवसेनेच्या उपतालुका संघटकपदी त्यांची नव्याने नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मालगुंड गावातील शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

