(रत्नागिरी)
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक अंतर्गत भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी यांच्या वतीने संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने निःशुल्क सात दिवसीय निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम ०१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत दररोज सायं. ५.३० वाजता घेण्यात आला आहे.
या अंतर्गत योग शिकवला जाणार आहे सहभागी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
हा अभ्यासक्रम भारतरत्न डॉ. पां. वा. काणे, रत्नागिरी उपकेंद्र, अरिहंत मॉल, तिसरा मजला, बसस्टँड जवळ, रत्नागिरी येथे होणार आहे तरी नोंदणीसाठी आणि अधिकच्या माहितीसाठी प्रा. अक्षय माळी ( 77984 90615) या क्रमांकावर संपर्क साधावा. नाव नोंदणी साठी https://forms.gle/D3cqWXj5NsCuqEQe8 या लिंकचा वापर करावा. हा अभ्यासक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य असून, योग विषयक रस असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि खासकरून महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांच्यावतीने करण्यात आले आहे.