(मुंबई /रत्नागिरी प्रतिनिधी)
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात कोकणात होणाऱ्या प्रवासी गर्दीचा ओघ लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने चाकरमान्यांच्या सेवेसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. मुंबईसह गुजरातमधून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी एकूण पाच गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या गाड्या ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ मध्ये धावणार आहेत.
या विशेष गाड्यांमुळे मुंबई, ठाणे, पालघर, वडोदरा, विश्वामित्री आदी ठिकाणांहून कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ठोकूर, रत्नागिरी, सावंतवाडी रोड यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांपर्यंत या गाड्या धावणार असून प्रवास अधिक आरामदायक होणार आहे.
विशेष गाड्यांचे तपशीलवार वेळापत्रक आणि मार्ग
🔷 गाडी क्र. ०९०११/०९०१२ – मुंबई सेंट्रल – ठोकूर (साप्ताहिक विशेष)
जाणारी: मंगळवार (२६ ऑगस्ट, २ सप्टेंबर) – सुटण्याची वेळ: ११:३०
परतीची: बुधवार (२७ ऑगस्ट, ३ सप्टेंबर) – ठोकूरहून सुटण्याची वेळ: ११:००
प्रमुख थांबे: रत्नागिरी, सावंतवाडी रोड, कुडाळ, मडगाव, कारवार, उडुपी
डबे: २४ (२ टियर एसी – १, ३ टियर एसी – १, स्लीपर – १६, जनरल – ४, SLR – २)
🔷 गाडी क्र. ०९०१९/०९०२० – मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड (आठवड्यातून ४ दिवस)
जाणारी: बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार (२२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान)
परतीची: गुरुवार, शनिवार, रविवार, सोमवार
प्रमुख थांबे: रत्नागिरी, कुडाळ, कणकवली, सिंधुदुर्ग, झाराप
डबे: २४ (२ टियर एसी – १, ३ टियर एसी – १, स्लीपर – १६, जनरल – ४, SLR – २)
🔷 गाडी क्र. ०९०१५/०९०१६ – बांद्रा (टी) – रत्नागिरी (साप्ताहिक विशेष)
जाणारी: गुरुवार (२१, २८ ऑगस्ट, ४ सप्टेंबर)
परतीची: शुक्रवार (२२, २९ ऑगस्ट, ५ सप्टेंबर)
प्रमुख थांबे: खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, आरवली रोड
डबे: २२ (सर्व सीटिंग LHB – २० सेकंड सीटिंग, SLR – १, जनरेटर – १)
🔷 गाडी क्र. ०९११४/०९११३ – वडोदरा – रत्नागिरी (साप्ताहिक विशेष)
जाणारी: मंगळवार (२६ ऑगस्ट, २ सप्टेंबर)
परतीची: बुधवार (२७ ऑगस्ट, ३ सप्टेंबर)
प्रमुख थांबे: भरुच, सूरत, वलसाड, पालघर, पनवेल, रत्नागिरी
डबे: २१ (फर्स्ट एसी – १, २ टियर – २, ३ टियर – २, स्लीपर – ६, जनरल – ४, इतर – ३)
🔷 गाडी क्र. ०९११०/०९१०९ – विश्वामित्री – रत्नागिरी (द्वि-साप्ताहिक विशेष)
जाणारी: बुधवार, शनिवार (२३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर)
परतीची: गुरुवार, रविवार (२४ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर)
प्रमुख थांबे: सूरत, वलसाड, वसई रोड, चिपळूण, आरवली रोड, संगमेश्वर
डबे: २४ (२ टियर एसी – १, ३ टियर एसी – १, स्लीपर – १६, जनरल – ४, SLR – २)
या विशेष गाड्यांचे आरक्षण लवकरच सुरू होणार असून, प्रवाशांनी IRCTC वेबसाइट आणि जवळच्या रेल्वे स्थानकांवरून तपशील घ्यावेत. गणेशोत्सवात कोकणचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, चाकरमान्यांच्या चेहऱ्यावर यामुळे समाधान झळकणार आहे.