(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी शहरातील मराठा मंदिर विद्यावर्धिनी स.रा.देसाई डी.एल.एड. कॉलेजचे उपक्रमशील, संवेदनशील, विचारांचे भांडार आणि उत्तम व्यक्तिमत्व असे प्राध्यापक श्री.सुनिल रामा जोपळे यांची रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरण येथे स्थापन करण्यात आलेल्या (SAMVAD Unit) संवाद युनिटमध्ये, समाजसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालय दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मा.उच्च न्यायालय मुंबई यांच्या NALSA (संवाद सिमांत, असुरक्षित आदिवासी आणि विमुक्त/भटक्या जमातीसाठी न्याय मिळवून देण्याच्या सुविधेला बळकटी देणे) योजना २०२५ च्या अंमलबजावणीसाठी प्रा.श्री. सुनिल रामा जोपळे, नाचणे रत्नागिरी यांची या उद्देशाने स्थापन केलेल्या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती अध्यक्ष सुनील एस.गोसावी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी व आर.आर.पाटील सचिव जिल्हा विधी प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून करण्यात आली. प्रा.श्री. सुनिल रामा जोपळे यांची अर्गिनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल संघटना (OFROT) संघटना रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष असून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे.अनेक शैक्षणिक व सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. तसेच ते उत्तम व्याख्याते आहेत.
ट्रेस मॅनेजमेंट, समुदेशन मोटीव्हेशन, करिअर गायडन्य, गोल सेटिंग, ध्येय निश्चिती अशा अनेक विषयावर मार्गदर्शन करत आलेले आहेत. तसेच सामाजिक बांधिलकी व सामाजिक जबाबदारी व उत्तरदामित्व असलेले व्यक्तिमत्व म्हणून प्रा.श्री. सुनिल रामा जोपळे यांच्याकडे पाहिले जाते.या नियुक्तीबद्दल प्राध्यापक सुनिल जोपळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.