(जैतापूर / राजन लाड)
नाटे बाजारपेठेत २९ जून २०२५ रोजी लागलेल्या भीषण आगीत सात दुकाने जळून खाक झाली होती. या आगीत निकिता नारायण गोसावी यांचे सौंदर्य पार्लर पूर्णतः भस्मसात झाले असून, जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार किरण उर्फ भैया सावंत यांची कन्या व युवा नेतृत्त्व अपूर्वा सामंत यांनी तातडीने नाटे येथे भेट दिली. त्यांनी निकिता गोसावी यांच्या नुकसानाची जबाबदारी स्वतःच्या अपूर्वा ताई सामंत फाउंडेशनच्यावतीने उचलण्याचे आश्वासन दिले होते.
त्या आश्वासनानुसार, आज जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या हस्ते निकिता गोसावी यांना रोख एक लाख रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली.
या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख अश्फाक हाजू, तालुका प्रमुख दीपक नागले, अपूर्वा सामंत यांचे पी.ए. सर्वेश तेंडुलकर, राजापूर कार्यालय प्रमुख प्रसन्ना मालपेकर, युवा उपतालुकाप्रमुख उमेश उर्फ बंड्या चव्हाण, महिला उपतालुकाप्रमुख प्राजक्ता पांचाळ, विभागप्रमुख मनोज आडविलकर, महिला विभाग प्रमुख स्वरा भोसले, महिला उपविभाग प्रमुख पूजा करंगुटकर, युवा उपविभाग प्रमुख अजय बंदरकर, साखरी-नाटे शाखाप्रमुख अल्ताफ बोरकर, तसेच साद फडणीस व आतिफ हातवडकर उपस्थित होते.
या मदतीमुळे निकिता गोसावी यांना नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक आधार मिळाला असून, स्थानिक पातळीवरून अपूर्वा सामंत फाउंडेशनच्या या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

