(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील आबिटगाव येथे कुणबी विकास मंडळ, वहाळ विभाग ग्रामीण/मुंबई यांच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवार, दिनांक १३ जुलै २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुंबई अध्यक्ष अनंत कोदारे यांच्या हस्ते व विभागातील पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी समाजहिताच्या विविध विषयांवर उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास माजी सभापती सुरेश खापले, माजी उपसभापती शरद शिगवण, ग्रामीण विभागाचे उपाध्यक्ष नारायण दुर्गवले, सहसचिव विजय कोकमकर, खजिनदार तेजस केंबळे, उपसरपंच अमोल कोदारे, सरपंच दिनेश पुनवत व सुहास भागडे, तसेच रविंद्र कोकमकर, दौलत आगरे, सचिन घाणेकर, अनिल गोमाणे, शांताराम मांडवकर, रमेश नेवरेकर, महादेव भागडे, संजय (बावा) भागडे, बाळाराम भागडे, समीर भागडे, महादेव कांबळे, सुनील मांडवकर, यशवंत भुवड, कृष्णा शिगवण, विजय डावल, सुभाष जावळे, शशिकांत घेवडे, प्रवीण खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला वहाळ विभागातील अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंडळाचे सचिव संतोष बळकटे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

