(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे गावचे सुपुत्र तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठ संचालित, कर्मवीर हिरे महाविद्यालयातील इंग्रजी अध्यापन पद्धती या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले श्री. रामचंद्र यशवंत मेढेकर यांना मुंबई विद्यापीठ, मुंबईची शिक्षणशास्त्र विषयातील( इंग्लिश लँग्वेज टिचिंग) पीएच.डी. पदवी नुकतीच जाहीर करण्यात आली.
प्रा.रामचंद्र मेढेकर यांनी “अ स्टडी ऑफ इफेक्टिव्हनेस ऑफ मल्टीमीडिया प्रोग्राम फॉर इंग्लिश ॲट सेकंडरी लेवल” या विषयावर आपला शोध प्रबंध मुंबई विद्यापीठास सादर केला होता. सदर पीएच.डी. पदवी अभ्यासक्रम त्यांनी पीएच.डी.अभ्यास केंद्र शासकीय अध्यापक महाविद्यालय, पनवेल, जि. रायगड येथे पूर्ण केला.सदर शोध प्रबंध प्राचर्या व माजी उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सौ. रमा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. त्यांना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस , प्राचार्य डॉ. डी.एस.मो रूस्कर, प्राचार्य ए.डी. कुंभार यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
प्रा. मेढेकर यांना श्री मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष श्री सतेज उर्फ बंटी पाटील, चेअरमन मधुकर आप्पा देसाई, संचालक प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुमार शिंदे, डॉ.अरविंद चौगुले, डॉ.संजय देसाई, डॉ.जी. एस. म्हागोरे. डॉ.शशिकांत चव्हाण यांची प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. प्रा. डॉ . रामचंद्र मेढेकर हे मालगुंड एज्युकेश सोसायटीचे माजी विद्यार्थी असून त्यांनी यापूर्वी मराठा मंदिर मुंबईच्या संस्थेत जत जि.सांगली व रत्नागिरी येथील अ.के. देसाई या विद्यालयातील त्यांनी शिक्षक म्हणून उत्तम अध्यापन करुन नावलौकिक संपादन केला होता. मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री सुनिल मयेकर व सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे खास अभिनंदन केले आहे.