(संगमेश्वर)
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर व संस्थेचे ट्रस्टी कार्याध्यक्ष डॉ.भिमराव य. आंबेडकर यांच्या आदेशाने संपूर्ण भारतात सुरू झालेल्या वर्षांवास कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी संस्कार विभाग व तालुका शाखा संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामशाखा कुळ्येवाशी तालुका संगमेश्वर या ठिकाणी आयु.विजय जाधव उपाध्यक्ष संस्कार विभाग यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात दिनांक १० जुलै २०२५ रोजी आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमेला सकाळी ११ वा.मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली
प्रारंभी बुद्ध विहारात तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मूर्तीला पुष्प व पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर आदर्शांना पंचाग प्रणाम करून त्रिशरण पंचशील व सूत्र पठण घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रवचनकार आद.अनंत सावंत जिल्हा अध्यक्ष व सचिव संस्कार विभाग महाराष्ट्र राज्य यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. आपल्या ओजस्वी वाणीमधून गुरुपौर्णिमा व वर्षांवासाचे महत्त्व या विषयावर महामायेला झालेली गर्भधारणा, सिद्धार्थ गौतमाचा ग्रृह त्याग, भगवान बुद्धांचा पहिला उपदेश व वर्षांवास प्रारंभ या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
यानंतर एन.बी.कदम, प्रदीप जाधव, जनार्दन मोहिते, विजय कांबळे, ज.भा.कदम, राहुल मोहिते, महेंद्र कदम, सुभाष जाधव, सुधीर जाधव, आर.बी.कांबळे, संजय कांबळे, अशोक जाधव, प्रकाश कांबळे, अरुणकुमार मोरे, अनिल घाडगे, वैभव जाधव, राजेंद्र मोहिते यांनी मनोगत व्यक्त करुन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले की, तथागत भगवान बुद्धांनी सुरु केलेला वर्षांवास हा बौद्ध धम्मातील पवित्र व मंगल असा कालावधी आहे या कालावधीत प्रत्येक मानवाने आपल्या मनातील वाईट विचार, अकुशल कर्म घालवून चिंतन, मनन करुन कुशल कर्म, मंगल कर्म करावे आणि आदर्श जीवन जगावे असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्पेश सकपाळ सचिव संस्कार विभाग यांनी केले व सर्वांचे आभार वैभव जाधव यांनी मानले. त्यानंतर शरणत्तय घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.