(रत्नागिरी)
तालुक्यातील हातखंबा येथील ४५ वर्षीय संजय श्रीकांत बोंबले यांनी राहत्या घरी ग्रामोझोन हे विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्राथमिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथील सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
ही घटना २६ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली होती. सी.पी.आर. हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आमृ. क्र. ५४/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र संजय बोंबले यांनी विष का प्राशन केले, यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस तपास सुरू असून, कुटुंबीय व स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.