(रत्नागिरी)
वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे येथील सहाय्यक शिक्षक श्री. प्रशांत विचारे हे ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार दि.३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विचारे हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. जगताप सर यांनी केले. सर्वप्रथम दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.
त्यानंतर सत्कारमूर्ती श्री.प्रशांत विचारे सर आणि त्यांच्या पत्नी सौ. विचारे मॅडम यांचा संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, संचालक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने शाल,श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन श्री.विचारे सरांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर प्रशालेतील क्रीडाशिक्षक डॉ.राजेश जाधव आणि सहा.शिक्षिका सौ.देवयानी कदम यांनी विचारे सरांनी त्यांच्या सेवाकाळात एक शिक्षक, सहकारी, मार्गदर्शक म्हणून पार पाडलेल्या विविध भूमिकांवर प्रकाश टाकताना त्यांचा गौरव केला. तसेच संस्थेचे माजी सहसचिव श्री.शत्रुघ्न लंबे सर, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री.वंजोळे सर यांनी सरांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी संस्थेच्या वतीने संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.दिवाकर जोशी यांनी विचारे सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षक.श्री.संदिप जंगम यांनी केले, तर श्री.विश्वनाथ चिले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विचारे, उपाध्यक्ष श्री.रामनाथ आडाव, सचिव श्री.समीर बोरकर कोषाध्यक्ष श्री. दिवाकर जोशी, संस्थेचे संचालक श्री.संदीप सुर्वे श्री.तुषार चव्हाण, माजी मुख्याध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

