(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील छत्रपती नगर नाचणे परिसरात घरासमोर उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय रमेश पावसकर (वय ५५, रा. घर क्र. ७०७ ई, छत्रपती नगर, नाचणे, ता. जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली असून, दि. ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.४५ ते ९.१५ च्या दरम्यान ही घटना घडली. पावसकर यांनी आपल्या राहत्या घरासमोर एक्सेस १२५ (एम.एच.०४/के.ई.७२०८) ही दुचाकी उभी केली होती. या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची संमती न घेता आणि फसवणुकीच्या हेतूने गाडी लंपास केली.
चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत अंदाजे २० हजार रुपये असून, ती गडद जांभळ्या रंगाची आहे. या प्रकरणी गुन्हा र. नं. २९२/२०२५ नोंदवण्यात आला असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस तपास करत आहेत.