(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बौद्धवाडी येथील धम्मचेतना बुद्धविहारात रविवार, दिनांक 20 जुलै 2025 रोजी वर्षावास धम्मप्रबोधन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम बौद्धजन पंचायत समिती, तालुका शाखा रत्नागिरी, संस्कार समिती रत्नागिरी, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 17 मालगुंड, बौद्ध ग्रामस्थ मंडळ मालगुंड (स्थानिक व मुंबई मंडळ) तसेच आदर्श महिला मंडळ मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पार पडणार आहे.
कार्यक्रमात संस्कार समितीच्या बौद्धाचार्य करुणा पवार या प्रमुख प्रवचनकार म्हणून धम्मविषयक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच संपूर्ण कार्यक्रम शाखा क्र. 17 चे अध्यक्ष रविकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. याप्रसंगी तालुका अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, उपचिटणीस शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संस्कार समितीचे पदाधिकारी, बौद्धाचार्य, श्रामणेर, गाव पातळीवरील शाखांचे प्रमुख प्रतिनिधी आणि धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे असेल –
भगवान बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तींना पुष्पहार अर्पण, गंध व दीपप्रज्वलन, बुद्धवंदना, मान्यवरांचे स्वागत, धम्मप्रवचन, अध्यक्षीय मार्गदर्शन आणि आभार प्रदर्शन अशा टप्प्यांत कार्यक्रम साजरा होणार आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मालगुंड येथील शाखा क्र. 17, बौद्ध ग्रामस्थ मंडळ मालगुंड (स्थानिक व मुंबई), तसेच आदर्श महिला मंडळ मालगुंड यांनी जय्यत तयारी केली असून, सर्व सभासद बंधू-भगिनी विशेष मेहनत घेत आहेत. या धम्मप्रबोधन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष प्रकाश पवार आणि मालगुंड शाखेचे अध्यक्ष रविकांत पवार यांनी केले आहे