(रत्नागिरी)
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ आधीनस्त कृषि महाविद्यालय, दापोली अंतर्गत ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्ग कोळंबे गावात कार्यरत असलेल्या मृदासूत गटाने दि. ५ जुलै २०२५ रोजी कोळंबे ग्रामपंचायत येथे महिला बचत गटाच्या मासिक सभेत विविध कृषि विषयांवर प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.
या प्रात्यक्षिकांमध्ये आवळा कँडी बनवण्याची कृती, बियाण्याचे वर्ग आणि बियाण्याच्या टॅग्सची ओळख, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक रोग व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रात्यक्षिकांनंतर महिलाना विद्यापीठाने केलेल्या कामांबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने डॉ. बा. को. कृ. विद्यापीठाची वार्तापत्रके वाटण्यात आली.
या उपक्रमाचे उद्दिष्ट महिला बचत गटांच्या सदस्यांना फळ प्रक्रिया व शाश्वत शेतीतील महत्त्वाच्या बाबी समजावून देणे, तसेच त्यातून व्यवसायाच्या संधी निर्माण करणे हे होते. या कार्यक्रमात एकूण ३३ महिलांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालय, दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. एल. कुणकेरकर, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे, विषय विशेषज्ञ डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. उदयकुमार पेठे, डॉ. परेश पोटफोडे, डॉ. एस. एन. काळे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.
ह्या उपक्रमात प्रणव देसाई, विजय दराडे, विपुल डोंगरकर, राजवर्धन गायकवाड, सुमित भादवे, वेदांत गिरी, सार्थक दिवाळे, आकाश गावडे, ओंकार फराडे आणि संकेत देशपांडे ह्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.