(रत्नागिरी)
श्रीमती पार्वती शंकर बापट काशिनाथ महाविद्यालय, वाटद खंडाळा येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने विविध कायद्यांबाबत साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. आर. पाटील, महाविद्यालयाचे उपाध्यक्ष श्री. आढाव, सचिव श्री. बोरकर, मुख्याध्यापक श्री. जगताप यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व लोकअभिरक्षक कार्यालयातील वकील उन्मेष मुळ्ये उपस्थित होते.
श्री. पाटील यांनी आपल्या मनोगतात बालकांविषयी असलेल्या कायदेविषयक तरतुदींबाबत विद्यार्थ्यांना अवगत केले. बाल न्यायमंडळ, जिल्हा बालकल्याण समिती यांचे कार्य, विधी संघर्षित बालक, काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालक यांविषयी तरतुदींची तसेच बालंकावरील अन्याय, अत्याचार निवारण करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे बालकांसाठी विधी सेवा पुरविणारे पथक स्थापन झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत जातीभेद न पाळण्याचे व धार्मिक विद्वेष न वाढविण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची असल्याचे कथन केले.
या प्रसंगी अॕड मुळ्ये यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण बालकांबाबतची योजना २०२४ विषयी मुलांना माहिती दिली तसेच बालकांचे हक्क, शिक्षणाचा हक्क, या विषयी मुलांना मार्गदर्शन केले.