(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील स्व. आत्माराम नारायण देसाई सोमेश्वर माध्यमिक विद्यालय विल्ये मांजरे तिठा या विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. शशिकांत रामचंद्र कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्व. आत्माराम नारायण देसाई सोमेश्वर माध्यमिक विद्यालय विल्ये मांजरे तिठा या विद्यालयात श्री कमलाकर हेदवकर हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. ते मे महिन्यात सेवानिवृत्त झाले. या रिक्त पदावर स्व. आत्माराम नारायण देसाई सोमेश्वर माध्यमिक विद्यालय विल्ये मांजरे तिठा या विद्यालयातील मराठी व इतिहास विषयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.शशिकांत रामचंद्र कांबळे यांची शिक्षण संस्थेने मुख्याध्यापक पदावर नियुक्ती केली. श्री शशिकांत रामचंद्र कांबळे यांनी या विद्यालयात गेली २९ वर्ष अध्यापनाचे उत्तम काम केले आहे.
श्री.कांबळे यांची विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिक्षण संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री भाऊ देसाई, सेक्रेटरी अविनाश देसाई तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, शिक्षणप्रेमी नागरिक, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

