(जाकादेवी / वार्ताहर)
भारतीय हौशी कबड्डी महासंघ यांच्यामार्फत आंध्र प्रदेश येथे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ५१ व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता रत्नागिरी तालुक्यातील डॉ. नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाचा खेळाडू वेदांत कांबळे या अष्टपैलू खेळाडूची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या यजमानपदाखाली ५२वी कुमार कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने आंध्र प्रदेश येथे १५ ते १८ जानेवारी या कालावधीत कुमार गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी तालुक्याचा सुपुत्र व डॉ नानासाहेब मयेकर फाउंडेशन मालगुंड संघाचा अष्टपैलू खेळाडू वेदांत कांबळे या खेळाडूची निवड झाली आहे.
वेदांत कांबळे या खेळाडूला मालगुंड गावचे सुपुत्र व प्रसिद्ध कबड्डीपटू बाबा मयेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. वेदांत कांबळे याचे रत्नागिरी तालुक्यातून तसेच क्रीडा विभागातून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत

