(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मठात भाविकांसाठी एक भक्तिरसपूर्ण आणि आध्यात्मिक अनुभव देणाऱ्या विविध धार्मिक उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
दिनांक १० जुलै २०२५ रोजी कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पूजेनं होणार आहे. त्यानंतर ८ वाजता पादुकांवर अभिषेक, दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा, आणि १२.३० वाजता महाआरती होईल. त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, रात्री ७.३० वाजता सायंआरतीने कार्यक्रमाची सांगता होईल.
या सर्व कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री. सहदेव पावसकर यांनी केले आहे.