(दापोली)
दापोली पोलीस ठाण्याचे नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांचे होमगार्ड विभागाच्या वतीने औपचारिक स्वागत करण्यात आले.
या स्वागत कार्यक्रमाला होमगार्ड तालुका समादेशक अधिकारी राजेश राजवाडकर, फलटण नायक मारुती लिंगावळे, फलटण नायक शुभांगी देवळेकर मॅडम, तसेच सचिन खोपकर, तेजस भारदे, विजय सणस, सागर निकम, अंकित शिगवण, सचिन पुळेकर, विनायक झगडे, विनीत कदम, स्वरूपा मुकनाक, आकांक्षा गुहागरकर यांसारखे अनेक होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी होमगार्ड कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, “होमगार्ड दलाने आपल्या अनुभव व कौशल्याचा उपयोग करून पोलीस प्रशासनास भक्कम सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.”
तोरसकर यांनी विशेषतः सामाजिक सलोखा राखणे, गुन्हेगारी नियंत्रणात आणणे आणि तरुणांमध्ये जनजागृती वाढवणे या क्षेत्रात पोलीस व होमगार्ड यांच्यातील समन्वयातून परिणामकारक कार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.