(दापोली)
दापोली तालुक्यातील लाडघर गावातून मायलेक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याबाबतची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी गितेश मस्कर (वय २३) आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी श्रीशा गितेश मस्कर या दोघी आपल्या माहेरी, विनया विलास घडवले यांच्या घरी मौजे लाडघर, शंकरवाडी येथे राहण्यासाठी आल्या होत्या.
मात्र, २९ जून रोजी सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास, मानसी यांनी कोणालाही काहीही न सांगता आपल्या मुलीसह घरातून अचानक बाहेर पडल्या. त्यानंतर रात्री उशीर होईपर्यंत त्या दोघी परतल्या नाहीत किंवा कुठेही आढळून आल्या नाहीत.
आपल्या मुलगी व नात बेपत्ता झाल्याची तक्रार मानसी यांची आई विनया घडवले यांनी ३० जून रोजी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. सदर घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.