(दापोली)
कोणत्याही कार्याचे विश्लेषण केल्याने आत्मपरीक्षण होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होतो, असे मत पंचायत समिती दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलीक यांनी व्यक्त केले. एन. के. वराडकर व बेलोसे महाविद्यालय दापोली येथे व्हिजन दापोलीतर्फे आयोजित शिष्यवृत्ती आढावा सभेत ते बोलत होते.
मंडलीक म्हणाले, ठराविक शाळा आणि शिक्षकांच्या विद्यार्थ्यांना यश मिळते; मात्र सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले तर तालुक्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थी यशस्वी ठरतील. मुलांना संधी देणे, मानसिक तयारी करणे आणि गणिताचा सातत्याने सराव करणे आवश्यक आहे. विश्राम म्हणजे कामात बदल असून बुद्धिमान व्यक्ती सामान्य कामही मनापासून करते, असे त्यांनी सांगितले.
या वेळी गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी मंडलीक यांचे स्वागत करून सभेची प्रस्तावना केली. सचिव सुनिल कारखेले यांनी 2024-25 या वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षेचा विश्लेषणात्मक निकाल सादर केला. तसेच व्हिजन दापोली”लोगो” सर्व शाळांना मान्यवचे हस्ते वितरीत करण्यात आला. मार्गदर्शक शिक्षक अश्विनी थोरात व नितीन बेणेरे यांनी मनोगते व्यक्त केली. शाळानिहाय निकालाचा आढावा घेत पुढील परीक्षेची ध्येयनिश्चिती करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत सुर्वे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनंत झिमन यांनी केले. सभेला व्हिजनचे अध्यक्ष धनंजय सिरसाट, विस्तार अधिकारी विद्या पवार, तसेच सर्व केंद्रप्रमुख आणि मान्यवर उपस्थित होते.

