( दापोली )
झेरॉक्स काढण्यासाठी घराबाहेर पडलेले वयोवृद्ध नैसर्गिक विधीसाठी गेले असताना पाण्यात पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वडवली (ता. दापोली) येथे घडली. विठ्ठल निकम (वय ६५, रा. वडवली आदिवासीवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
निकम हे वडवली गावठाण येथे रेशनकार्ड आणि आधारकार्डची झेरॉक्स काढण्यासाठी गेले होते. मात्र झेरॉक्स काढण्याआधीच, त्यांनी दर्शन पांढरे यांच्या घराच्या खालील बाजूस नैसर्गिक विधीसाठी पऱ्यामध्ये गेले असताना याच दरम्यान त्यांचा तोल जाऊन ते उपड्या स्थितीत पाण्यात पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
स्थानिकांनी त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे नेले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू क्रमांक ४७/२०२५ प्रमाणे करण्यात आली असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १९४ अंतर्गत पुढील तपास सुरु आहे.

