( दापोली )
दापोली शहर व्यापारी महासंघातर्फे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री. महेश तोरस्कर यांचे आज (३ जुलै) शहरात हार्दिक स्वागत करण्यात आले. यावेळी महासंघाने शहरात कोणतेही नियोजन करताना व्यापारी संघटनेला विश्वासात घेण्यात यावे, असे निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनासोबत नेहमीच सहकार्याची भूमिका घेण्याचा पुनरुच्चार करत, शहराच्या विकासात प्रशासनाबरोबर काम करण्याची तयारी दर्शवली.
निवेदन देताना महासंघाचे अध्यक्ष श्री. संदीप राजपुरे, उपाध्यक्ष राकेश कोटिया व कौशिक मेहता, सचिव दिनेश जैन, खजिनदार माणिक दाभोळे, सहखजिनदार जावेदभाई मणियार तसेच कार्यकारिणी सदस्य योगेश पिंपळे, प्रशांत शेठ, मंगेश वारसे, प्रीतम शिंदे, प्रमोद पांगारकर, राजेंद्र बोथरे, महेश जैन आदी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

