(दापोली)
दापोली तालुक्यातील सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच दापोली तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष असलेले संतोष गजानन हजारे यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ, मुंबई तर्फे दिला जाणारा “राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार – २०२५” प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार समारंभ कराड (जि. सातारा) येथे संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हजारे सरांचा गौरव करण्यात आला.
शांत, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या हजारे सरांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची राज्यस्तरावर दखल घेत ही सन्मानाची निवड झाली आहे.
या मानाच्या पुरस्काराबद्दल राज्य मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष संदेश राऊत, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अय्युब मुल्ला, माजी संचालक जी.एन. पाटील, उपाध्यक्ष किशोर नागरगोजे, संचालक बिपिन मोहिते, दापोली तालुका माध्यमिक अध्यापक संघ अध्यक्ष दीपक पवार, कार्याध्यक्ष सत्यवान दळवी, सचिव चंद्रकांत मोरे, जिल्हा प्रतिनिधी संदीप क्षिरसागर, तसेच कोकण विभाग उपाध्यक्ष अविनाश पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी संतोष हजारे यांचे

