(मुंबई / प्रतिनिधी)
राज्यातील पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमांमध्ये (MDS) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘नीट एमडीएस-२०२५’ परीक्षेच्या आधारे होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेची नोंदणी ३ जुलै २०२५ पर्यंत करता येणार आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) दिली आहे.
राज्य कोट्यातील सरकारी, महामंडळ, केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानित तसेच खासगी व अल्पसंख्याक महाविद्यालयांतील MDS अभ्यासक्रमांसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. नोंदणीसह शुल्क भरणे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम मुदत १३ जुलैपर्यंत आहे.
प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक :
ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख : ३ जुलै
राज्य कोट्यांतर्गत जागांचा तपशील जाहीर : ३ जुलै
तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध : ४ जुलै
महाविद्यालय पसंतीक्रम भरण्याची मुदत : ४ ते ६ जुलै
प्रथम फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर : ८ जुलै
महाविद्यालयात प्रवेश घेण्याची अंतिम तारीख : ९ ते १३ जुलै

