(रत्नागिरी)
जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांवर आपले नाव कोरले. ही स्पर्धा काल (२१ नोव्हेंबर) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत नवनिर्माण हायस्कूलतर्फे सहभागी झालेल्या संस्कृती शांताराम कोकरे (इयत्ता आठवी) हिने आपल्या सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावले. खुशियाल श्यामजी गुप्ता (इयत्ता आठवी) याने रौप्य पदक, तर श्रावणी विजय गुरव आणि मुस्कान नजरुल इस्लाम (दोघीही इयत्ता सातवी) हिने कांस्य पदकाची कमाई केली.
या विद्यार्थ्यांना कराटे मार्गदर्शक सौ. स्वप्नाली पवार यांच्यासह शाळेचे क्रीडाशिक्षक अमृत गोरे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल नवनिर्माण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो : जिल्हास्तरीय शालेय कराडे स्पर्धेत नवनिर्माण हायस्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांसह क्रीडाशिक्षक अमृत गोरे.