(खेड)
तालुक्यातील चाकाळे येथील विशाल सुधाकर चव्हाण (वय ४२) यांचा मुरडे गावातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. पाण्याचा पंप काढण्यासाठी ते विहिरीत उतरले असता हा अपघात घडल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच विसर्जन कट्टा, खेड या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष शिंदे, सदस्य साहिल बुटाला व निखिल चौधरी (मदत ग्रुप, खेड), तसेच खेड नगरपालिका अग्निशामक विभागाचे कर्मचारी सूरज शिगवण आणि जयेश पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अथक प्रयत्न करून मृतदेह विहिरीबाहेर काढला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.