(रत्नागिरी)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या शासन निर्णयाची (जीआर) होळी रविवारी रत्नागिरी येथे करण्यात आली. हा निषेध कार्यक्रम रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जयस्तंभ समोर करण्यात आला. या वेळी शिवसेना उपनेते श्री. सुरेंद्रनाथ उर्फ बाळासाहेब माने आणि माजी राज्यमंत्री श्री. रविंद्रजी माने प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख श्री. सहदेवजी बेटकर, जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख श्री. रविंद्रजी डोळस, श्री. संजय पुनसकर, जिल्हा संघटक श्री. संतोषजी थेराडे, लोकसभा महिला संपर्क संघटक सौ. नेहाताई माने, जिल्हा महिला संघटक सौ. वेदाताई फडके, विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. प्रमोदजी शेरे, राजापूर विधानसभा क्षेत्र संघटक श्री. रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर, महिला विधानसभा क्षेत्र संघटक सौ. सायली पवार, रत्नागिरी तालुकाप्रमुख श्री. शेखर घोसाळे, राजापूर तालुकाप्रमुख श्री. कमलाकर कदम, लांजा तालुकाप्रमुख श्री. सुरेश करंबेळे, संगमेश्वर तालुकाप्रमुख श्री. नंददीप उर्फ बंड्या बोरुकर, चिपळूण तालुकाप्रमुख श्री. बळीराम गुजर, शहरप्रमुख श्री. प्रशांत साळुंखे, लांजा शहरप्रमुख श्री. मोहन तोडकरी, महिला तालुका संघटक सौ. पूर्वा मुळ्ये, युवासेना उपजिल्हा अधिकारी श्री. संतोष हातणकर, संगमेश्वर युवासेना तालुका अधिकारी श्री. तेजस शिंदे, मा. नगरसेविका सौ. रशिदा गोदड यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, आजी-माजी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि मातृभाषेच्या स्थानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.