(रत्नागिरी)
फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पावस येथील एका ७० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे मृत्यू झाला. ही घटना २३ जून रोजी सकाळी साडेसहा वाजता घडली. डॉक्टरांनी तपासणीनंतर वृद्धाचा मृत्यू घोषित केला.
सखाराम भिकाजी पावसकर (वय ७०, रा. पावस, खारवीवाडा, ता. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे, त्यांना गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसासंबंधी आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १९४ अंतर्गत पुढील तपास सुरू आहे.