(रत्नागिरी)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषि महाविद्यालय, दापोलीतर्फे ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कोळंबे गावात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मृदासूत गटाने ग्रामपंचायत, कोळंबे येथे विविध दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. ह्या प्रात्यक्षिकामध्ये पनीर, लस्सी, सुगंधी दूध(फ्लेवर्ड मिल्क), आणि पनीर बनविण्याच्या प्रक्रियेतून उत्पन्न झालेल्या निवळीचे पेय बनविण्याच्या पाककृतींचा समावेश होता.
कु. सार्थक दिवाळे यांना उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरवात केली. त्यानंतर कु. राजवर्धन गायकवाड यांनी घरच्या घरी पनीर बनविण्याची प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगितली. कु. संकेत देशपांडे आणि कु. प्रणव देसाई यांनी पनीर बनविण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.
यानंतर कु. ओंकार फराडे यांनी लस्सी बनविण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. लस्सी तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक कु. वेदांत गिरी आणि कु. सुमित भादवे यांनी करून दाखवले. त्यानंतर कु. आकाश गावडे यांनी सुगंधी व्हॅनिला दूध बनविण्याची पाककृती सादर केली. यानंतर कु. विजय दराडे आणि कु. विपुल डोंगरकर यांनी व्हॅनिला दूध बनविण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.
यानंतर कु. प्रणव देसाई यांनी पनीर प्रक्रियेत उतपन्न होणाऱ्या निवळीचे महत्त्व आणि निवळी पासून पेय बनविण्याच्या पाककृती बद्दल माहिती दिली. त्यानंतर कु. ओंकार फराडे यांनी निवळी पासून पेय बनविण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सादर केली. उपस्थितांना बनविलेले पदार्थ चाखण्याकरिता वितरित करण्यात आले. कु. विजय दराडे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
सदर प्रात्यक्षिकास प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कृषितज्ञ व केंद्रप्रमुख डॉ. किरण मालशे, विषय विशेषज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे, रावे कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. ह्या प्रात्यक्षिकास ३५ महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत, निवळीपासून तयार केलेले पेय त्यांच्यासाठी एक नाविन्यपूर्ण अनुभव असल्याचे सांगितले. बाजारातून दुग्धजन्य पदार्थ खरेदी करण्याऐवजी ते घरीच तयार करण्याचे महत्त्व व फायदे त्यांना लक्षात आले. या प्रात्यक्षिकातून प्रेरणा घेऊन महिलांना हे पदार्थ त्यांच्या दैनंदिन आहारात समाविष्ट करण्याची प्रेरणा मिळाली.