(मुंबई)
महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. आता 7/12 उतारा, 8अ, फेरफार नोंदी आणि ई-रेकॉर्ड्स यांसारखी जमिनीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे थेट WhatsApp वर मिळणार आहेत. त्यामुळे सेतू केंद्रांमध्ये रांगेत उभं राहण्याची गरज संपणार आहे. महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाने (Land Records Department) हा क्रांतिकारी निर्णय घेतला असून, ही सुविधा १५ जुलै २०२५ पासून प्रायोगिक तत्वावर सुरू होणार असून, १ ऑगस्ट २०२५ पासून संपूर्ण राज्यात लागू केली जाणार आहे.
सेवा कशी मिळवायची?
-
अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या:
🔗 https://bhumiabhilekh.mahabhumi.gov.in -
आपला मोबाईल नंबर नोंदवा आणि OTP च्या सहाय्याने पडताळणी करा.
-
५० रुपये नोंदणी शुल्क एकदाच भरावे लागेल.
-
नोंदणी पूर्ण झाल्यावर, फक्त १५ रुपयांमध्ये WhatsApp वर विविध सेवा मिळू शकतील.
-
ही नोंदणी करण्यासाठी जमिनीचा मालक असणे आवश्यक आहे.
या सुविधा मिळणार WhatsApp वर
-
7/12 उतारा, 8 अ, फेरफार नोंदी व ई-रेकॉर्ड्स हे डिजिटल आणि प्रमाणित स्वरूपात थेट WhatsApp वरून डाउनलोड करता येतील.
-
जमिनीशी संबंधित कायद्यांची माहिती, प्रक्रियेचे मार्गदर्शन व हक्क याबाबत प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात सल्ला मिळेल.
-
आपल्या जमिनीच्या नोंदींमध्ये काही बदल झाल्यास तत्काळ सूचना WhatsApp वर मिळेल, जेणेकरून फसवणूक टाळता येईल.
या बदलांमुळे होणारे फायदे
- दलालमुक्त प्रक्रिया – थेट शासकीय प्लॅटफॉर्मवरून सेवा मिळणार
- घरबसल्या कागदपत्रे मिळणार – शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार
- डिजिटल, प्रमाणित दस्तावेज – अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह
- कामात गती – कागदपत्रांसाठी इथून तिथं धावपळ करण्याची गरज नाही
- फसवणुकीला आळा – जमिनीच्या मालकीबाबत अधिक पारदर्शकता
१ ऑगस्टपासून सुरू होणारी ही सेवा महाराष्ट्रातील डिजिटल भूमी व्यवस्थापनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. डिजिटल भारताच्या दिशेने हे एक अत्यंत स्वागतार्ह आणि लोकाभिमुख पाऊल मानले जात आहे.

