(गुहागर / रामदास गमरे)
बौद्धजन सहकारी संघ (ता. गुहागर, जि. रत्नागिरी – पेवे विभाग क्र. २, शाखा निगुंडळ) यांच्या वतीने शाखेचे माजी सभासद व माजी मुख्याध्यापक दिवंगत दत्ताराम पवार यांची सून सौ. आदिती (सोना) विनायक पवार, रा. निगुंडळ यांनी मुंबई विद्यापीठातून एल.एल.बी. परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले आहे.
सौ. आदिती पवार यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत चिकाटी, सातत्य आणि ध्येयदृष्टीने परिश्रम घेत हे यश संपादन केले. समाजातील विविध स्तरातून त्यांच्या या यशाचे विशेष कौतुक होत आहे.
कळमुंडी गावचे सुपुत्र मोतीराम रामचंद्र मोहिते व सौ. सुगंधा मोहिते यांच्या द्वितीय कन्या असलेल्या आदिती यांना बालपणापासूनच डॉक्टर किंवा वकील होण्याचे स्वप्न होते. त्याच दिशेने प्रयत्न करत त्यांनी उच्चशिक्षण पूर्ण केले.
त्यांच्या यशात पती विनायक दत्ताराम पवार यांचा मोलाचा वाटा असून, त्यांनी आपल्या पत्नीच्या स्वप्नपूर्तीमध्ये संपूर्ण साथ दिली. त्यामुळे संघाच्या वतीने त्यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
सौ. आदिती आणि श्री. विनायक पवार या दांपत्यास उज्वल भवितव्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून, त्यांचे यश अन्य स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास बौद्धजन सहकारी संघाने आपल्या परिपत्रकात व्यक्त केला आहे. हे परिपत्रक संघाचे कार्याध्यक्ष दीपक मोहिते, सरचिटणीस संदेश गमरे आणि इतर सहकाऱ्यांतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.