(चिपळूण)
कळंबस्ते (ता. चिपळूण) येथील डॉ. नाजनीन खलील चिकटे यांनी आपल्या बुद्धिमत्ता आणि चिकाटीच्या जोरावर १० जून रोजी कॅनडातील एका प्रतिष्ठित विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशामुळे संपूर्ण कळंबस्ते गावासह चिपळूण तालुक्यात अभिमानाची लहर उसळली आहे.
डॉ. चिकटे यांनी परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करून आपल्या मातृभूमीचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
माजी सभापती शौकत मुकादम यांनी डॉ. चिकटे यांचे विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “त्यांच्या यशामुळे चिपळूण तालुक्यातील तरुणाईसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
विदेशात शिक्षण घेऊनही आपल्या गावाशी नाळ जपणाऱ्या डॉ. नाजनीन चिकटे यांचे यश नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरूच असून, शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी उंच भरारी घ्यावी, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.