(रत्नागिरी)
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे आज वाहतूक सुरक्षा बाबत अनोखा व लक्षवेधी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. जनजागृतीसाठी चक्क यमा ची वेशभूषा करून नागरिकांना वाहतूक नियमांची माहिती, रस्ता सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन, तसेच हेल्मेट व सीटबेल्ट वापराचे महत्त्व सांगण्यात आले.
रत्नागिरी शहरातील जेल रोड नाका येथे रोटरी सदस्यांनी पत्रके वाटून जनजागृती केली. तसेच यमाचा वेशभूषा केलेली व्यक्ती हेल्मेट न घातलेला तसेच सीट बेल्ट न लावलेला लोकांना हेल्मेट व सीटबेल्ट वापरायला सूचना करत होता. रोटरी क्लब तर्फे ज्या वाहनधारकांनी हेल्मेट घातले होते तसेच सीट बेल्ट वापरले होते त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार कारण्यात आला व प्रोत्साहन देण्यात आले.
रोटरीचा वाहतूक सुरक्षा जागृती उपक्रमाला रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे,माजी पोलिस अधिकारी श्री.सासणे, आरटीओचे अधिकारी, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री रुपेश पेडणेकर, सचिव अॅड.मनिष नलावडे, खजिनदार माधुरी कळंबटे, रोटरीचे पदाधिकारी कॅप्टन दिलीप भाटकर, विनायक हातखंबकर अशोक घाटे, श्रीकांत भुर्के, प्रमोद कुलकर्णी, निलेश मुळ्ये, रोहित वीरकर तसेच असंख्य रोटरी क्लबचे सदस्य तसेच वाहतूक पोलिस उपस्थित होते.