(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सावर्डे पोलिसांनी चोख तपास करत तब्बल 1.34 कोटी किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत इलेक्ट्रीक पोल चोरीप्रकरणी तिघा ट्रेलर चालकांना अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
सावर्डे पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्र. 56/2025 अन्वये IPC 2023 चे कलम 303(2), 3(5) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. फिर्यादी अखिलेश कुमार प्रजापती यांच्या तक्रारीनुसार, 450 लोखंडी इलेक्ट्रीक पोल, किंमत अंदाजे 74,84,098, हे श्री. सचिन वारे यांच्या वहाळ फाटा, सावर्डे येथील मोकळ्या जागेत ठेवण्यात आले होते. अज्ञात आरोपींनी फिर्यादीच्या संमतीशिवाय ट्रेलरच्या साहाय्याने हे पोल चोरून नेले.
तपासादरम्यान पोलीसांनी तीन ट्रेलर ट्रॅक केले. यापैकी दोन कोलाड (जि. रायगड) येथे, तर एक ट्रेलर कामथे येथे सापडला. तपास पुढे नेऊन पोलिसांनी राजस्थानातील तीन चालकांना अटक केली. यामध्ये सुरेश नंदलाल खारोल (वय २४, अजमेर, राजस्थान), पिंटु भना (वय २२, रा. अजमेर, राजस्थान), पुखराज श्रीकिशन भील (वय २२, रा. अजमेर, राजस्थान ) अटकप्राप्त आरोपींना १० जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या तपासात चोरीस गेलेले सर्व 450 पोल व तीनही ट्रेलर्स हस्तगत करण्यात आले असून एकूण मुद्देमालाची किंमत 1,34,24,589/- इतकी आहे.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्रकुमार टाजमाने, प्रभारी अधिकारी, स.पो.नि श्री. आबासो पाटील, तपास पथकातील अधिकारी व अंमलदार ,पो.उप.नि गमरे, पो.हवा. साळुंखे, कांबळे, कोळेकर, म.पो.हवा. कान्हेरे, पो.शि. भांगरे, जड्यार, म.पो.कों. मुंढे, जाधव, पो.कॉ. चव्हाण, साठे आदींचा समावेश होता. या यशस्वी कारवाईत 100% मुद्देमाल हस्तगत केल्याची ही उल्लेखनीय कामगिरी पोलिस दलाच्या दक्षतेचे आणि कार्यक्षमतेचे जिवंत उदाहरण ठरली आहे.