( रत्नागिरी )
महाराष्ट्र ज्ञानपीठ सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिरच्या तीन विद्यार्थ्यांनी आपापल्या गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता पहिलीमधील मल्हार अलंकार साळवी याने राज्यात प्रथम, इयत्ता दुसरीतील रावी मृणाल वारंग हिने राज्यात प्रथम आणि इयत्ता तिसरीतील मुक्ता नितीन पळसुळेदेसाई हिनेही राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
मुंबईच्या महाराष्ट्र ज्ञानपीठातर्फे सामान्य ज्ञान परीक्षा परीक्षा नोव्हेंबर २०२४ मध्ये रत्नागिरी येथे घेण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक सौ. वेदिका हातखंबकर, सौ. प्रीती देवरुखकर, सौ. भारती खेडेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्धल शाळेच्या मुख्याध्यपिका सौ. प्राजक्ता कदम, शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, समितीचे प्रमुख विनायक हातखंबकर व भारत शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.