आरसीबीने अखेर १८ व्या वर्षी आयपीएलची ट्रॉफी जिंकली आणि विराट कोहलीचे स्वप्न साकार झाले. आरसीबीने पंजाब किंग्सवर आयपीएलच्या फायनमलध्ये ६ धावांनी विजय साकारला आणि त्यांनी प्रथम विजेतेपदाला गवसणी घातली. यावेळी विराट कोहलीला अश्रू अनावर झाले. दुसरीकडे पंजाब किंग्जनेही आक्रमक फलंदाजी केली. एकानंतर एक फलंदाज परतत असताना शशांक सिंगने चांगलीच झुंज दिली. परंतु थोडक्यात पंजाब किंग्जला सामना गमवावा लागला.
रजत पाटीदार आणि विराट कोहलीच्या आरसीबीने फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा पराभव करून आयपीएल २०२५ च्या चषकावर नाव कोरले. या विजयामुळे कर्नाटकसह विराटच्या चाहत्यांचा उत्साह प्रचंड होता. त्यातच आरसीबीच्या आयपीएल विजेतेपदाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे बंगळुरुत अनेक चाहते चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी जमा झाले होते. लाखोंची गर्दी उसळल्याने चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला तर ४० हून अधिक जखमी झाले आहेत. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे हा आनंदोत्सव शोकांतिकेत बदलला. या घटनेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अधिकृत निवेदन जारी करून शोक व्यक्त केला आहे.
आरसीबीकडून निवेदन

