(मुंबई)
ऑनलाईन न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, ओटीटी सेवांसह विविध डिजिटल माध्यमांना आता शासकीय जाहिराती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने ‘डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचना – २०२५’ जाहीर केल्या असून, शासकीय माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि डिजिटल युगातील माध्यमांचा नियोजनबद्ध वापर करण्याचा यामागे उद्देश आहे.
या नव्या धोरणामुळे पुढील माध्यमांना मिळणार जाहिरातींचा लाभ :
📌 वेबसाइट्स
-
ऑनलाईन न्यूज पोर्टल्स
-
ब्लॉग्स
-
शैक्षणिक, आरोग्यविषयक, ई-कॉमर्स व मनोरंजन संकेतस्थळे
📌 डिजिटल प्लॅटफॉर्म्स
-
सोशल मीडिया: फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर)
-
ओटीटी प्लॅटफॉर्म्स: हॉटस्टार, जिओ सिनेमा, झी५, अॅमेझॉन प्राइम
📌 सोशल मीडिया प्रभावक (Influencers)
-
मेगा ते नॅनो स्तरावरील इन्फ्लुएन्सर्स
-
स्थानिक भाषेतील मजकुराला प्राधान्य
-
विश्वासार्हता हे महत्त्वाचे निकष
धोरणाची वैशिष्ट्ये
-
पारदर्शक व नैतिक जाहिरात प्रक्रिया:
या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश जाहिरात प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि नैतिक ठेवणे आहे. -
माध्यमांसाठी ठोस निकष:
अश्लीलता, फेक न्यूज, दिशाभूल करणारी माहिती किंवा बेकायदेशीर मजकूर प्रसारित करणाऱ्या व्यासपीठांना जाहिराती दिल्या जाणार नाहीत. -
मोजमाप ठरवणारे मेट्रिक्स:
इम्प्रेशन्स, रीच, CTR, कन्व्हर्जन रेट, ब्रँड सेंटिमेंट यांसारख्या विश्लेषणात्मक निकषांवर जाहिरात प्रभाव मोजला जाणार आहे. -
‘प्रेस सेवा पोर्टल’वर अनिवार्य नोंदणी:
जाहिरातींसाठी पात्र होण्यासाठी सर्व डिजिटल माध्यमांनी प्रेस सेवा पोर्टलवर नोंदणी केलेली असावी. -
काळ्या यादीतील कारवाई:
धोरणांचे उल्लंघन केल्यास संबंधित प्लॅटफॉर्म ब्लॅकलिस्ट केला जाईल आणि त्याचे देयके रोखण्यात येतील. -
ऑनलाइन बीजक सादरीकरण:
जाहिराती मंजूर मोहिमेनुसार आणि ऑनलाइन बीजक सादर करूनच देयके वितरित केली जातील. -
मीडिया प्लॅन समितीची देखरेख:
जाहिरातींच्या दर्जावर आणि नैतिकतेच्या अंमलबजावणीवर विशेष समिती देखरेख करणार आहे.
वरिष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली सहा वर्षे या मागणीसाठी शासन दरबारी अथक प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच ग्रामीण भागापासून मेट्रो सिटी पर्यंत विस्तृत जाळे असलेल्या डिजिटल मीडिया मधील संपादक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार महाबळेश्वर व कनेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महा अधिवेशनादरम्यान सुद्धा तात्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत संघटनेला आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुद्धा महायुतीच्या सर्व नेत्यांनी केल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले आहेत.
ही नवी जाहिरात धोरण राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केली असून, डिजिटल युगातील माध्यमांमार्फत शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती साधण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण पावले मानली जात आहेत.