आजकाल स्मार्टफोनमध्ये अनेकजण इंस्टंट मेस्सेजिंग अॅप या व्हॉट्सअॅपचा वापर करतात. हे अॅप आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत संवाद साधण्यासाठी चांगला पर्याय आहे. यात कंपनीदेखील वापरकर्त्यांच्या सोयीसाठी अनेक फीचर्स दिलेले आहेत. मात्र, स्कॅमर्स या अॅपच्या काही फीचर्सचा चुकीच्या पद्धतीने वापर करून तुमचा मोबाईल हॅक करू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल हॅकिंग पासून कसा दूर ठेऊ शकता हे जाणून घ्या.
आजच्या वापरल्या जाणाऱ्या स्मार्टफोनमध्ये लोकांची महत्त्वाची माहिती असते. त्यामुळे स्कॅमर्स नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचे स्मार्टफोन हॅक करण्याचा प्रयत्न करतात.
व्हॉट्सअॅपच्या ‘या’ फीचरमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता
आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सअॅपमध्ये वापरकर्त्यांना फोटो, व्हिडीओ इत्यादी ऑटो डाउनलोड करण्याची व्यवस्था आहे. यामुळे जर एखाद्या स्कॅमरने तुम्हाला मालवेअर किंवा स्पायवेअर पाठवला तर तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. त्यामुळे व्हॉट्सअॅपमधील ऑटो डाउनलोड सेटिंग बंद करून ठेवणे आवश्यक आहे.
आपल्या व्हॉट्सअॅपवर अश्या पद्धतीने बंद करा हे सेटिंग्ज.
1. सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅ प उघडा.
2. नंतर होम स्क्रीनवर वरील उजव्या कोपऱ्यात तीन वर्टिकल डॉट्सवर क्लिक करा.
3. त्यानंतर Settings ऑप्शनवर क्लिक करा.
4. मग Storage and dataऑप्शनवर क्लिक करा.
5. येथे तुम्हाला Media auto-downloadसेक्शनमध्ये तीन ऑप्शन्स मिळतील.
6. या ऑप्शन्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व बॉक्स अनटिक करायचे असतील.
7. त्यामुळे मोबाईल डेटा किंवा Wi-Fi वर कनेक्ट असताना तुमच्या फोनमध्ये कोणतीही मीडिया फाइल आपोआप डाउनलोड होणार नाही.
अश्या पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल हॅक होण्यास प्रतिबंध करू शकता.