(मुंबई)
जगभरात कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी रविवारी (14 डिसेंबर) मुंबईत दाखल झाला. आपल्या लाडक्या हिरोची एक झलक पाहण्यासाठी भारतासह मुंबईतील हजारो फुटबॉलप्रेमी चर्चगेट परिसरात जमले होते.
एरवी क्रिकेटच्या गजरात रंगणारे वानखेडे स्टेडियम रविवारी पूर्णपणे फुटबॉलमय झाले होते. चर्चगेट स्थानकापासून वानखेडेकडे जाणाऱ्या परिसरात चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतरत्न सचिन तेंडुलकर, बॉलिवूड स्टार अजय देवगण, टायगर श्रॉफ तसेच भारताचा स्टार फुटबॉलर सुनील छेत्री यांची विशेष उपस्थिती लाभली.
या प्रसंगी राज्य सरकारच्या क्रीडा विभागाच्या पुढाकाराने, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), CIDCO आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉलच्या विकासासाठी ‘प्रोजेक्ट महादेवा’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. ‘प्रोजेक्ट महादेवा’चा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना फुटबॉलमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियमवर हा सोहळा पार पडला.
या योजनेअंतर्गत 13 वर्षांखालील खेळाडूंच्या निवड चाचण्या महिनाभरापूर्वी नेरुळ येथील यशवंतराव चव्हाण फुटबॉल मैदानात घेण्यात आल्या होत्या. या चाचणीत एकूण 419 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामधून 40 गुणवान खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यात 20 मुले आणि 20 मुली यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, या निवड झालेल्या युवा खेळाडूंना रविवारी वानखेडे स्टेडियमवर आमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांना थेट लिओनेल मेस्सीकडून फुटबॉलचे धडे गिरवण्याची सुवर्णसंधी मिळाली. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरला.

ज्या मैदानावर क्रिकेटचे अनेक विक्रम घडले, त्या वानखेडे स्टेडियममध्ये फुटबॉलचा देव म्हणजेच लिओनेल मेस्सी सायंकाळी 6 वाजता दाखल झाला. मेस्सीच्या एन्ट्रीने चाहत्यांचा जल्लोष शिगेला पोहोचला. चाहत्यांनी ‘मेस्सी, मेस्सी’ असा जयघोष करत संपूर्ण स्टेडियम दणाणून सोडले. या ऐतिहासिक भेटीदरम्यान, मेस्सीने भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री याची भेट घेतली. दोन्ही स्टार खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या, हा क्षण चाहत्यांसाठी खास ठरला.
ज्या मैदानावर क्रिकेटचे अनेक विक्रम घडले, त्या वानखेडे स्टेडियममध्ये फुटबॉलचा देव म्हणजेच लिओनेल मेस्सी सायंकाळी 6 वाजता दाखल झाला. मेस्सीच्या एन्ट्रीने चाहत्यांचा जल्लोष शिगेला पोहोचला. चाहत्यांनी ‘मेस्सी, मेस्सी’ असा जयघोष करत संपूर्ण स्टेडियम दणाणून सोडले. या ऐतिहासिक भेटीदरम्यान, मेस्सीने भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री याची भेट घेतली. दोन्ही स्टार खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या, हा क्षण चाहत्यांसाठी खास ठरला. याच कार्यक्रमात फुटबॉल या खेळातील दिग्गज खेळाडू आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन आणि मेस्सीची पहिल्यांदाच भेट झाली. या भेटीदरम्यान सचिनने आपली १० नंबरची भारतीय संघाची जर्सी मेस्सीला भेट म्हणून दिली. तर मेस्सीनेही सचिनला फुटबॉल गिफ्ट केला. ही भेट ऐतिहासिक ठरली. कारण २ वेगवेगळ्या खेळातील २ दिग्गज खेळाडू एकाच स्टेजवर येण्याची ही पहिलीच वेळ होती.
प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत निवड झालेले खेळाडू – मुले:
आर्यव्रत आशिष सारस्वत, निहार विकास नांबियार, आर्य राममूर्ती नायडू, दैविक कमलेश गलानी, रणवीर सिंह चावला, आरव चंद्रकांत सोनवणे, मल्हार लक्ष्मीकांत सावंत, अनय अमित भुसकुटे, तनिष चंद्रशेखर मल्लि, आर्यन संतोष पिंगळे, लक्ष्य नरेश मळकर, गिरीश मेनन, एफ्रॉन अॅग्नेलो डिसा, कनिष्क संजय मिश्रा, निहार कृष्ण एस, तनय रंजीत, शीहान बॅनर्जी, विहान नागधर बांदी, स्वरित संजय सातपुते, हर्षित नरेंद्र निकम.
प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत निवड झालेल्या खेळाडू – मुली:
स्वयंप्रभा महाराणा, जीविका राजपूत, निहारिका सुरेश, हना खान, स्वर विक्रम कुदळे, नव्या पाटील, जीविका रुपेजा, कृतिका राय, दुर्वा तर्मळे, रेबेका सिबी, समायरा सिग, कियाराह अनिरुद्ध सराफ, मन्नत धीरज आहुजा, अक्षरा आदर्श शेट्टी, आश्मी आदर्श शेट्टी, आरझू विकास कदम, लावण्य रविंद्र ठाकरे, अनु मेघा रूपेश, त्रयी प्रभाष शेट्टी, इराम शमशुद्दीन फाटक.

